ग्रामपंचायत वाडीवऱ्हे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वाडीवऱ्हे येथे संविधान गौरव दिन साजरा

आजची विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक होण्यासाठी संविधानाची अंमलबजावणी आवश्यक.. एडवोकेट भारत बुकाने.. वाडीवरे..जिल्हा परिषद शाळा वाडीवरे यांच्या वतीने भारतीय संविधान...
Read More →

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांवर सोलर प्रकल्प

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांवर सर्व शाळां, अंगणवाडी, बौद्ध विहार पशु वैद्यकीय दवाखाना , ग्रामपंचायत कार्यालय...
Read More →

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजअभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींकडूनभनवासी मालमत्ता कर व अन्य करथकबाकी वसुलीत सवलत देणेबाबत.

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजअभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींकडूनभनवासी मालमत्ता कर व अन्य करथकबाकी वसुलीत सवलत देणेबाबत ग्रामपंचायतीने गांवची ग्रामसभा घेऊन मागील थकबाकी...
Read More →

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बाल विवाह प्रतिबंध रॅली

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नाशिक व विपला फौंऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १०० दिवसीय बाल विवाह प्रतिबंध संकल्प...
Read More →

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कामांचा आढावा बैठक विविध कामांचा शुभारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कामांचा आढावा बैठक घेऊन वृक्ष लागवड करणे तसेच ग्रामपंचायत करवसुली तसेच ग्रामस्वच्छता नागरिकांच्या सोयीसुविधा...
Read More →

जिल्हा परिषद शाळा

17

वाडीवऱ्हे गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही शिक्षणासाठी एक महत्त्वाची संस्था आहे. गावातील लहान मुलांना प्राथमिक शिक्षण सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही शाळा स्थापन करण्यात आली आहे. शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, पोषण आहार (मिड-डे मील), वाचनालयाची सुविधा आणि खेळाचे साहित्य पुरवले जाते. ही शाळा गावातील साक्षरतेत मोठा वाटा उचलते.

घंटागाडी

13

वाडीवऱ्हे गावात घंटागाडी सेवा नियमितपणे कार्यरत आहे. ही सेवा गावातील कचरा संकलनासाठी वापरली जाते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावाची स्वच्छता राखण्यासाठी घंटागाडीचा उपयोग अतिशय महत्त्वाचा आहे. दररोज ठराविक वेळेला गावात फिरणारी ही गाडी नागरिकांना घरगुती कचरा देण्यासाठी प्रोत्साहित करते. यामुळे वाडीवऱ्हे हे गाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहते.

वैकुंठ रथ

14

गावात अंत्यविधीच्या प्रक्रियेसाठी वैकुंठ रथ ही महत्त्वाची सेवा उपलब्ध आहे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी अंत्यसंस्कारासाठी हे वाहन ग्रामपंचायतीमार्फत विनामूल्य किंवा अत्यंत कमी दरात पुरवले जाते. वाडीवऱ्हे गावातील रहिवाशांसाठी ही सेवा एक सामाजिक आधार ठरते. हे वाहन वेळेवर उपलब्ध होत असल्यामुळे अंतिम विधी शिस्तबद्धपणे पार पडतो.