ग्रामपंचायत वाडीवऱ्हे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वाडीवऱ्हे येथे संविधान गौरव दिन साजरा

आजची विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक होण्यासाठी संविधानाची अंमलबजावणी आवश्यक..

एडवोकेट भारत बुकाने..

वाडीवरे..
जिल्हा परिषद शाळा वाडीवरे यांच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिन आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी वाडीवरे गावातील तसेच शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचाही समावेश होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वाडीवरे गावचे ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी किशोरजी दळवे हे होते कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये.
प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय माळी तसेच त्यांचा पूर्ण स्टाफ
गावचे माजी सरपंच रोहिदास कातोरे,युवा नेते किरण कातोरे, तानाजी अहिराराव, सोनवणे सिस्टर, धनंजय पगार,
साकुर गावचे पोलीस पाटील शिवाजी सहाणे,
उपस्थित होते.
भारतीय संविधानचे शालेय विद्यार्थी जीवनात किती महत्त्वाचे आहे यावर ॲड. भारत बुकाने यांनी प्रबोधन केले..
त्यांनी प्रबोधनात म्हटले की भारतीय संविधानाने सर्व भारतीयांना मूलभूत हक्क बहाल केलेलं आहे.
तसेच शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी संविधान अंगीकरले तर निश्चितच आजचे विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक होतील..
असे ही ॲड भारत बुकाने यांनी त्यांच्या शुभेच्छा पर भाषणात मांडले.
सदर कार्यक्रमाच्या सुरवातीस शाळेच्या विद्यार्थी वर्गाने गावामध्ये संविधान फेरी आयोजित करून ग्रामस्था ना जनजागृती साठी आवाहन केले.
कार्यक्रम पश्चात ॲड भारत बुकाने यांनी शाळेसाठी भारतीय संविधान ग्रंथ भेट दिली..
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक खैरनार सर.मुख्याध्यापक ,
रेखा बच्छाव मॅडम.
सुनीता जाधव मॅडम.
कविता कोळसुरे मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रकांत सोनवणे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार स्मिता गायकवाड मॅडम यांनी केले.
कार्यक्रम सांगते वेळेस सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी संविधान उद्देशिका चे सामूहिक वाचन केले…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *