मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मा आमदार श्री. हिरामण खोसकर साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच कार्यक्रमास तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित होते, मा.आमदार साहेब यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत अंतर्गत ५ टक्के दिव्यांग निधी वितरण करण्यात आला. तसेच कृषी विभागांअंतर्गत किसान कार्ड व आरोग्य विभागांअंतर्गत गोल्डन कार्ड, तहसील विभागांअंतर्गत संजय गांधी निराधर लाभार्थी निवड आदेश वितरण करण्यात आले.





